पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

।।क्षरला सागर गंगा ओघी मिळे ।।

इमेज
जय हरी ! क्षरला सागर गंगा ओघी मिळे । आपणचि खेळे आपणासी ।। मधील ते वाव अवघी उपाधी । तुम्हा आम्हामधी तेचि परी ।।........ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी या अभंगाद्वारे विश्वातील चिरंतन सत्य सांगितले. सागराच्या मनात एक खेळ खेळावा वाटले आणि त्याने आपले स्थान सोडले व वाफेच्या रूपाने तो आकाशात गेला आणि तिथे ढग बनून विहार करू लागला त्याला पुढे गेल्यावर थंड वारे लागले आणि सागर ढगातून पाऊस होऊन बरसू लागला . तो हिमालयात , सह्याद्रीत व विविध डोंगरावर बरसला आणि त्या पर्वतावरून नदीच्या रूपाने उताराच्या दिशेने खळ खळ आवाज करीत धावू लागला काही ठिकाणी तो धबधबच्या रूपाने भयंकर रूप घेऊन धावू लागला... आम्ही त्याला नावे दिली ," गंगा मैया , यमुना मैया, नर्मदा मैया .... गोदावरी माता . " अशा नद्यांच्या रूपाने हाच सागर या पृथ्वीवरून सर्वत्र सुजलाम सुफलाम करीत जाऊ लागला .   त्याच्या तीरावर तीर्थक्षेत्रे निर्माण झाली आणि लोक पापक्षालनासाठी त्यात स्नान करू लागले. " पोखीत तिरींचे पादप । समुद्री जय आप गंगेचे जैसे ।।" खारट सागर पण गंगा यमुनेच्या रूपाने "गोड " झाला आणि लोकां...